प्रकल्पाचे नाव :

महाराष्ट्रात आरोग्यसेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन

कालावधी :

प्रायोगिक टप्पा : जून २००७ ते नोव्हेंबर २००८
पहिला टप्पा : डिसेंबर २००८ ते मार्च २०१२
दुसरा टप्पा : एप्रिल २०११ ते मार्च २०१२ आणि एप्रिल २०१२ ते मार्च २०१३

पार्श्वभूमी :

देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब जनतेला, स्त्रियांना आणि लहान मुलांना चांगल्या दर्ज्याची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून २००५ ते २०१२ चे राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन राबविण्यात आले. आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन हा या मिशनचा महत्त्वाचा भाग आहे, कारण त्यामुळे सेवा गरजू लोकांना मिळत आहेत याची खात्री करता येते. जन स्वास्थ्य अभियानाच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प राबविण्यात आला.
सरकारी आरोग्य क्षेत्रात उत्तरदायित्व आणि लोकांचे नेतृत्व व नियंत्रण कायं करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाउल आहे. देखरेख प्रक्रियेच्या अंतरगत जनसंपर्क, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि परामर्श प्रक्रिया सामील आहेत.
कोणत्या आरोग्य सुविधांची कुठे गरज आहे, कोणत्या समस्या आहेत व कोणत्या सुधारणा होणे गरजेचे आहे, याची सर्वोत्कृष्ट माहिती त्या आरोग्य सुविधेचे लाभार्थीच देऊ शकतात. आरोग्य सुविधांवर लोकाधारित देखरेख हा प्रकल्प लोकांना प्रक्रियेच्या केंद्रात ठेवतो. सामाजीक संघटना , एन.जी.ओ. व पंचायतीचे प्रतिनिधी, मिळून -- आरोग्याशि निगडीत गरजा , उपलब्ध सुविधा, त्यांचा व्याप, लोकांपर्यंत पोहोच, गुणवत्ता , प्रभाव , आरोग्य सुविधेच्या केंद्रांवर कर्मचाऱ्यांची उपस्थिती व वागणूक, कार्यक्षमता या सर्वांवर लक्ष ठेवतात. त्यांच्यातील गुण-दोशांबद्दल पुष्टी करतात. यामुळे सामान्य लोक आरोग्य-प्रणालीत सहभागी होतात. आरोग्य प्रणालीतील अधिकारी व कर्मचारी यांचे लोकांप्रती उत्तरदायित्व कायम राहते. कामात पारदर्शकता वाढते .

आरोग्य सुविधांवर लोकाधारित देखरेखीचे मुख्य उदेश्य

•स्थानिक समाजाच्या आरोग्यसंबंधित गरजा यांबद्दल आरोग्य सेवेच्या नियोजनाला उपयोगी अशी माहिती वेळोवेळी, पद्धात्शीर रित्या गोल करणे.
•स्थानिक मापदंडांनुसार व आरोग्य सेवेच्या दर्ज्याच्या मुख्य लक्षणांनुसार वेळोवेळी अहवाल देणे.
• सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे विविध घटक लोकांच्या आरोग्य हक्कांची पूर्ती करत आहेत का, याच्यावर लक्ष ठेवणे.
• आरोग्य सेवेच्या नियोजनात लोकांना आणि लोक-संघटनांना बरोबरीचे हिस्सेदार बनवणे

प्रकल्पाची संरचना आणि व्याप्ती

लोकाधारित देखरेख व नियोजन हे भारतातील काही निवडक राज्यांमध्ये राबविण्यात आले आहे. त्यांत महाराष्ट्र देखील सामील आहे. महाराष्ट्र राज्यात १३ जिल्ह्यांची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्याचे काम अमरावती, नंदुरबार , उस्मानाबाद , पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये चालू झाले. दुसऱ्या टप्प्यात हे काम औरंगाबाद, बीड, गडचीरोळी , चंद्रपूर ,नाशिक , कोल्हापूर ,रायगड आणि सोलापूर या जील्यांमध्ये विस्तारित करण्यात आले. गाव, तालुका , जिल्हा आणि राज्य पातळीवर देखरेख व नियोजनाचे काम चालते. त्यात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्राम पंचायतीचे प्रतिनिधी, लोक-संघटना, एन.जी.ओ. आणि सामान्य ग्रामस्थ, यांचा सहभाग असतो.

मुख्य उपक्रम

1. प्रकाशने- देखरेख प्रक्रियेसाठी लागणारे सर्व साहित्य प्रकाशित करणे . हे साहित्य मिळवण्यासाठी येथे क्लीक करा.
2. राज्यस्तरीय मार्गदर्शक समितीची स्थापना करणे. या समितीने प्रकल्पाच्या संरचनेत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
3.राज्यस्तरीय कार्यशाळेच्या माध्यमाने प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
4. जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या माध्यमाने प्रशिक्षकांचे प्रशिक्षण . जिल्हा स्तरीय मार्गदर्शक समिती नेमणे व प्रत्येक जिल्ह्यात सहायकांची नेमणुक .
5.तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र व गाव पातळीवर नियोजन व देखरेख समितीची नेमणुक
6. सर्व समिती-सदस्यांना प्रशिक्षण .
7. सर्व समिती सदस्यांकरवी माहिती गोळा करणे, आरोग्य सुविधेचे प्रमाणपत्र बनवणे
8. प्रसारमाध्यमांचा वापर करून प्रकल्पाचा प्रचार करणे
9. जनसुनवाई -- दर वर्षी एक वा दोन प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका , जिल्हा व राज्य पातळीवर जनसुनवाई घेणे, जेणेकरून लोकांच्या समस्यांवर खुली चर्चा घेता येईल
10. राज्यस्तरीय समीक्षा व मूल्यांकन व प्रलेखन करणे

राज्यस्तरीय समन्वय संस्था -- साथी सेहत

साथी - सेहत या संस्थेने राज्य पातळीवर समन्वयक जबाबदारी स्वीकारली आहे. सर्व साथिया, `टूल्स', `आरोग्य हक्क दिनदर्शिका' व माहिती गोळा करण्याचे साहित्य या संस्थेद्वारा प्रकाशित केले जाते. १३ संस्था जिल्हा स्तरावर आणि तालुका पातळीवर २९ संस्था सक्रिय आहेत. या सर्व संस्तांबरोबर समन्वय स्थापित करून नियोजन व देखरेखीचे काम केले जाते.

जिल्हा स्तरीय समन्वय संस्था

१. अमरावती - खोज
२. नंदुरबार - जनार्थ
३. उस्मानाबाद - हेलो मेदिकॅल फौंडेषण
४. पुणे - महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ
५. ठाणे - वन निकेतन
६. औरंगाबाद - मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS)
७. बीड - मराठवाडा नवनिर्माण लोकायत
८. चंद्रपूर - युथ अव्हेर्नेस & रुरल देव्हेलपमेंट
९. गडचीरोळी - आम्ही आमचे आरोग्यासाठी
१०. कोल्हापूर - संपदा ग्रामीण महिला संस्था
११.नाशिक - वचन
१२. रायगड - दिशा केंद्र
१३. सोलापूर - हेलो मेदिकॅल फौंडेषण
लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्पाच्या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कामाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

महाराष्ट्रात आरोग्यसेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन -माहितीपत्रक


महाराष्ट्रात आरोग्यसेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन - प्रकल्पाचा अहवाल ( २००७-१० )