जनसुनवाई

जनसुनवाई (Public Hearing) हा लोकाधारित देखरेख प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. लोकांचे सरकारी आरोग्यसेवांबाबतचे अनुभव आणि आरोग्यसेवांची सद्य:परिस्थिती याबद्दल एक जाहीर जनसुनवाईचा कार्यक्रम केला जातो. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, संस्था-संघटना, पंचायत सदस्य, सरकारी अधिकारी व स्थानिक सामाजीक क्षेत्रातील मान्यवर मंडळी हे सर्व उपस्थित असतात . वरील सर्वांसमोर दवाखानयाची इमारत, तेथील स्वच्छता , सोयी-सुविधा, रिक्त-पदं , औषधांची उपलब्धता यांची परिस्थिती तसेच दवाखान्यामधे नाकारलेल्या सेवा व चांगले - वाईट अनुभव मांडले जातात. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून गावात दिल्या जाणाऱ्यां सेवांबाबतच्या `प्रगती - पत्रकाचे' विश्लेषण सादर केले जाते. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्याबाबत या जाहीर कार्यक्रमात समोरासमोर स्पष्टीकरण विचारले जाते. नीट काम केले नाही , नीट वागले बोलले नाही, तर त्याबाबत जाहीर चर्चेला तोंड द्यावे लागेल हे लक्षात आल्यामुळे काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा झाली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्याही लोकांसमोर येत आहेत. या पद्धतीमुळे लोक व आरोग्य यंत्रणा यांच्यातील सत्तासंतुलन थोडेसे लोकांच्या बाजूने झुकले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आणि जिल्हा अशा तिन्ही पातळ्यांवर अशाप्रकारे जनसुनवाई व यानंतर एक राज्यस्तारीय कार्यक्रम घेतला जातो.

ग्रामीण दवाखाना जनसुनवाई

Sr.No. NameDate Added
1 Report of Khodala Jansunwai 2015-09-28

प्राथमिक आरोग्य केंद्र जनसुनवाई

Sr.No. NameDate Added
1 Report of Shahada Jansunwai 2015-09-28
2 Report of Bhavthana Jansanwad 2015-09-25
3 Report of Aundh Jansunai 2015-09-25
4 test jansunwai1 2015-08-11

जिल्हा स्तरीय रुग्णालय जनसुनवाई

Sr.No. NameDate Added

राज्य स्तरीय जनसुनवाई

Sr.No. NameDate Added